वरळीतील पोदार रुग्णालयाची बत्तीगुल, रुग्णांचे हाल

  • मुंबई लाइव्ह टीम & वैभव पाटील
  • सिविक

काही ना काही कारणाने मुंबईत वीजेचा लपंडाव सुरू आहे. त्याचा फटका आता मुंबईतल्या मोठ-मोठ्या रुग्णालयालाही बसत आहे. मागच्या आठवड्यात जे. जे. रुग्णालयातील वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यापाठोपाठ बुधवारी वरळी विभागातील पोदार आयुर्वेदिक रुग्णालयाची बत्तीगुल झाल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे.

पोद्दार रुग्णालय अंधारात

पोदार रुग्णालयातील प्रशासकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास वीज पुरवठा दीड तासासाठी खंडित झाला होता. त्याप्रमाणे बुधवारी सकाळी सात वाजता रुग्णालयातील वीज पुरवठा खंडित झाला. सकाळी गेलेली वीज ही तब्बल दोन तासानंतर आली.

जनरेटरची सुविधाच नाही

जे. जे. रुग्णालयात मागील आठवड्यात वीज गेल्याने रुग्णालयातील ऑपरेटिंग सिस्टिमदेखील बंद झाल्या होत्या. त्यामुळे रुग्णांची नावनोंदणीसुद्धा होऊ शकली नाही. त्याप्रमाणेच पोद्दार रुग्णालयात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर जनरेटरची सुविधा नसल्याने रुग्ण २ तास अंधारात होते.

तांत्रिक बिघाडामुळे गेली वीज

प्रशासकीय विभागाच्या माहितीनुसार तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित होत आहे. पोदार रुग्णालयामध्ये मंगळवारी आणि बुधवारी याच कारणाने वीज गेली असून याचं काम चालू आहे, असं देखील त्यांनी सांगितलं.


हेही वाचा -

जे. जे. हॉस्पिटलची बत्तीगुल

पुढील बातमी
इतर बातम्या