जोगेश्वरी वासियांना मिळणार नवं उद्यान

  • कल्याणी उमरोटकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

जोगेश्वरी - महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर जोगेश्वरी वासियांना एक नवं उद्यान लाभणार आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील कमाल अमरोही स्टुडिओच्या बाजूला पालिकेचे वेरावली जलाशय आहे. जलाशयाच्या विकासाबरोबरच बाजूला नवीन उद्यान विकसित केलं जाणार असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त रमेश बांबळे यांनी दिलीय. यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या निविदा प्रक्रीया देखिल अंतिम टप्प्यात असल्याचं त्यांनी सांगितलं.

उद्यानासाठी एकूण 3 कोटी 17 लाख रुपये इतका खर्च लागणार असून या प्रकल्पाचे काम दीड वर्षात पूर्ण होइल असं देखिल रमेश बांबळे यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या