भांडुपच्या पाटीलवाडीत सार्वजनिक शौचालय कोसळलं, दोघांचा मृत्यू

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • सिविक

सार्वजनिक शौचालय खचून ४ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची घटना भांडुपच्या पाटीलवाडी परिसरात घडली. यापैकी बाबूलाल देवासे (वय ४५) आणि लोबाबेन जेतवा (वय ४२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडली आहे. ज्या ठिकाणी ही शौचालयं होती तिथे मोठा खड्डा पडला आहे.

शौचालयाचा ढाचा जमीनदोस्त

भांडुपच्या टँक रोड परिसरात असलेल्या पाटीलवाडीतील साई सदन चाळीतील सार्वजनिक शौचालय सकाळच्या सुमारास खचलं. यामुळे जवळपास २० शौचालयांचा पूर्ण ढाचा जमीनदोस्त झाला.

या शौचालयांच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ४ व्यक्तींपैकी २ जणांचा मृत्यू झाला असून अजून दोन जणांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या घटनास्थळी अग्निशमन दल आणि पालिका आपत्ती निवारणाचे जवान पोहचले आहेत. अडकलेल्या लोकांना सुखरुपपणे बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या