फुटपाथवर कब्जा करण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

चेंबूर - सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी चेंबूरच्या फुटपाथवर कार्यालय थाटण्यासाठी फुटपाथच काबीज केलाय. चेंबूरच्या आरसीएफ गेटजवळ हा प्रकार सुरू आहे. मात्र याकडे पालिकाही दुर्लक्ष करते आहे. याठिकाणी रिकाम्या जागेवर शिवसेना, रिपाइं, भाजप, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं आपले झेंडे उभारून जागा अडवून ठेवली आहे. तर काहींनी याठिकाणी अनधिकृत कार्यालयं थाटलीही आहेत. सर्वच राजकीय पक्षांचा यामध्ये समावेश असल्यानं याठिकाणी कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही. या सर्व प्रकाराकडे महापालिकाही डोळेझाक करत असल्याचा आरोप काही रहिवाशांनी केलाय.

पुढील बातमी
इतर बातम्या