रेल्वे स्थानकातील 'इतक्या' फेरीवाल्यांवर कारवाई

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

रेल्वे स्थानकांवर बसणाऱ्या व लोकलमधील फेरीवाल्यांमुळं गर्दीच्यावेळी लोकलमध्ये प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या फेरीवाल्यांवर कारवाईही करण्यात येते, मात्र तरीही फेरीवाल्यांचं प्रमाण कमी झालं होत नव्हतं. त्यामुळं धावत्या लोकल आणि रेल्वे स्थानकांवरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने ऑपरेशन सुरुची राबवण्यास सुरुवात केली आहे.

फेरीवाल्यांवर कारवाई

या ऑपरेशनअंतर्गत रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाकडून ३ ते १० डिसेंबर या कालावधीत ८३५ गुन्ह्यांतील ८३५ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसंच, यापुढेही रेल्वे स्थानकांतील फेरीवाल्यांवर कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचं मध्य रेल्वेनं स्पष्ट केलं आहे.

मोठी दुर्घटना

रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांच्या वावरामुळं याआधी पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन स्थानकात (प्रभादेवी) मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत अनेक जणांनी आपला जीव गमावला असून काही गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर रेल्वेनं प्रशासनानं स्थानकातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरूवात केली होती.


हेही वाचा -

परदेशी नागरिकांना अंमली पदार्थ पुरविल्याप्रकरणी टुरिस्ट गाइडला अटक

धक्कादायक! 'तो' सेल्फी बघून पुरूषाने पुरूषावरच केला बलात्कार


पुढील बातमी
इतर बातम्या