पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात ६ सेगवे वाहने दाखल

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पश्चिम रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढवण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलात (आरपीएफ) सहा नवीन सेगवे वाहनं दाखलं झाली आहेत. यामुळे आरपीएफ दलातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना फेरफटका मारणं, आपत्कालीन स्थितीत मदतकार्य करणं, स्थानकांची पाहणी करणं सोपं होणार आहे.

बॅटरीवर चालणारी सेगवे वाहने

पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक ए. के. गुप्ता यांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी चर्चगेट स्थानकावर सहा सेगवे वाहनांचं उद्घाटन केलं. ही सहा सेगवे वाहनं बॅटरीवर चालणारी आहेत. तसंच, पश्चिम रेल्वे मार्गावरील गर्दीची स्थानकं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चर्चगेट, मुंबई सेंट्रल, अंधेरी, बोरीवली या स्थानकांवर प्रत्येकी एक सेगवे वाहन चालवण्यात येणार आहे. वांद्रे टर्मिनर्स इथं दोन सेगवे वाहनं चालवण्यात येणार आहेत.

आणखी पाच सेगवे वाहनं होणार दाखल

सहा सेगवे वाहनांद्वारे उपनगरीय रेल्वे स्थानकांवर रेल्वे सुरक्षा दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य पोहोचवणं सहज शक्य होणार आहे. या वाहनांमुळे अधिकाऱ्यांंना स्थानकावरील प्रत्येक गोष्टीचं बारकाईने निरीक्षण करण्यात मदत होणार आहे. पश्चिम रेल्वेप्रमाणेच पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात लवकरच आणखी पाच सेगवे वाहनं दाखल होणार आहेत. त्यावेळी ती सेगवे वाहने वांद्रे, गोरेगाव, मालाड, विरार, सुरत या स्थानकांवर चालवण्यात येणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली

पश्चिम रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) विविध प्रकारच्या यंत्रणा उपलब्ध करण्यात येतात. काही दिवसांपुर्वी पश्चिम रेल्वेवरील स्थानकांवर कॅमेरे बसविण्यात आले होते. तसंच, फोर्स वनकडून पश्चिम रेल्वेवर १२५, तर मध्य रेल्वेवरही २०६ कमांडो तैनात करण्यात आले होते. त्यातच आता भर म्हणजे पश्चिम रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढविण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलात सहा नवीन सेगवे वाहने दाखल झाली आहेत.


हेही वाचा -

लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये आता खानपान सेवेसाठी डिजिटल पेमेंटची सुविधा

अपघातग्रस्तांच्या मदतीला आता पश्चिम रेल्वेची 'आझाद ब्रिगेड'


पुढील बातमी
इतर बातम्या