नक्षली संबंधांच्या संशयावरून पुणे पोलिसांनी वरावर राव, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, वर्णन गोन्साल्विस आणि अरूण परेरा यांना अटक केली. या अटकेचा विरोध करत तसंच देशभरात मानवी हक्कांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात येत आहे, असा आरोप करत डाव्या, पुरोगामी संघटनांच्यावतीने शनिवारी मुंबईतील आझाद मैदानात निषेध मोर्चा काढण्यात आला.
सुडबुद्धीने हल्ले
देशाची ढासळती अर्थव्यवस्था, सनातन संस्था यांसारख्या संघटनांच्यावतीने पसरवण्यात येणारा भगवा दहशतवाद तसंच भीमा कोरेगाव येथील दंगलीला जबाबदार असणारे मनोहर भिडे आणि मिलिंंद एकबोटे यांच्यावर एफआयआर दाखल होऊनही कारवाई झालेली नाही. त्याचप्रमाणं देशातील जनतेचं लक्ष मूळ प्रश्नांवरून हटवण्यासाठी मानवी हक्क कार्यकर्त्यांवर सरकारी यंत्रणांकडून सुडबुद्धीनं हल्ले केले जात आहेत. या सर्व मुद्यांवर हा निषेध मोर्चा काढण्यात आला होता.
या आहेत प्रमुख मागण्या
मोदी सरकारने देशभरात अघोषित आणीबाणी सुरु केली आहे. याचा अाम्ही निषेध करत आहोत. लोकशाही हक्कांची पायमल्ली करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांना नक्षलवादाचा आधार घेऊन अटक केली जात आहे. हे बेकायदेशीर आहे. लोकशाहीमध्ये वेगळे विचार मांडण्याचा त्यांचा हक्क आहे.
- भालचंद्र मुणगेकर, माजी खासदार
हेही वाचा -
एनआयएऐवजी पुणे पोलिसांकडून कारवाई कशी? न्यायालयात याचिका
पालकांचा जीव टांगणीला, अन् 'त्या' ५ जणी करत होत्या 'मुंबई दर्शन'