साध्वी प्रज्ञांना अटक करा, अक्षेपार्ह वक्तव्याचा गोरेगावात तीव्र निषेध

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

भाजपाच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करत गोरेगावातील रहिवासी आणि राष्ट्र सेवा दलाच्या वतीनं साध्वी प्रज्ञाच्या अटकेची जोरदार मागणी करण्यात आली. गोरेगाव रेल्वे स्थानकाबाहेर जमलेल्या रहिवाशांनी साध्वी यांचा निषेध करणारे बॅनरही झळकावले.   

साध्वी प्रज्ञा यांना यापूर्वी मालेगाव बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. परंतु सध्या जामिनावर बाहेर असलेल्या साध्वींना भाजपाकडून भाेपाळमधून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

काय म्हणाल्या होत्या साध्वी?

मुंबईतील २६/११च्या हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांनी मला कुठलेही पुरावे नसताना तुरूंगात डांबलं. तिथं माझा प्रचंड छळ केला. तेव्हा मी करकरे यांना म्हटलं की तुमचा सर्वनाश होईल. माझ्या शापामुळेच त्यांचा मृत्यू झाला. ते देशद्रोही, धर्मद्रोही हाेते. दहशतवाद्यांना त्यांना ठार मारलं तेव्हा माझं सुतक संपल, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी एका प्रचारसभेत केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यावर त्यांनी याप्रकरणी जाहीर माफीही मागितली.

कार्यकर्त्यांकडून निषेध

साध्वी प्रज्ञा यांच्या आक्षेपार्ह विधानाविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली असून त्याच्याच निषेधार्थ शनिवारी गोरेगाव रेल्वेस्थानकाबाहेर आंदोलन करण्यात आलं. साध्वी यांचं वक्तव्य म्हणजे शहीद हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, तुकाराम ओंबळे यांचाही अवमान आहे. त्यामुळे त्यांना अटक झालीच पाहिजे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शांततामय मार्गाने केलेल्या निषेधानंतर पोलिसांनी निषेध करणाऱ्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं.


हेही वाचा -

मोदींविरोधात प्रचारासाठी 'बीएसई'च्या इमारतीचा मॉर्फ फोटोचा वापर

चित्रपट प्रदर्शित करण्याच्या नावाखाली निर्मात्याला सव्वा कोटीचा गंडा


पुढील बातमी
इतर बातम्या