रेल्वे स्टाॅलमध्ये आढळला उंदीर, वांद्र्यातील स्टॉल केला बंद

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकावरील एका स्टॉलच्या पोट माळ्यावर लिंबू सरबतासाठी अस्वच्छ पाण्याचा वापर केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाचं आता पश्चिम रेल्वेच्या वांद्रे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील एका स्टॉलमध्ये भेळ, चॉकलेटची बरणी आणि पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या काचेच्या बॉक्समध्ये उंदीर आढळल्याचं उघडकीस आलं आहे. रेल्वे स्थानकावरील एका प्रवाशानं मोबाइलमध्ये हा प्रकार चित्रीत करून रेल्वे प्रशासनाकडं त्याची तक्रार केली. त्यानंतर पश्चिम रेल्वेनं याबाबत तातडीनं दखल घेत, हा स्टॉल बंद केला आहे. 

खाद्यापदार्थ असुरक्षित

वांद्रे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील एका खाद्यापदार्थांच्या स्टॉलमध्ये एक मोठा उंदीर फिरत होता. ही घटना शनिवारी घडली असून, प्लॅटफॉर्मवरील एका प्रवाशाला हा उंदीर दिसला. त्याने त्वरीत या उंदराचा व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ या प्रवाशानं सोशल मीडियावर व्हायरल केला. 

स्टॉलचालकावर कारवाई

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये उंदीर खाद्यपदार्थांच्या जवळच फिरत असल्यचं दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पश्चिम रेल्वे प्रशासनानं याची तातडीनं दखल घेत, त्या स्टॉलचालकाच्या विरोधात कारवाई केली. तसंच, स्टॉलचालकाला १० हजार रुपयांचा दंड ठोठावून हा स्टॉल बंद केला आहे.


हेही वाचा -

८ वर्षांनंतर, ८ गडी राखून पंजाबनं केला मुंबईचा मोहालीत पराभव

मतदान, मतमोजणी दरम्यान ३ दिवस 'ड्राय-डे'


पुढील बातमी
इतर बातम्या