मुंबईचा बट्ट्याबोळ होण्यास बिल्डर, आर्किटेक्ट जबाबदार - रतन टाटा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत बिल्डर, आर्किटेक्ट पुनर्विकासाच्या नावाखाली उंचच उंच उभ्या झोपड्याच उभारत आहेत. ज्यात नागरिकांना मोकळी जागा,पुरेशी खेळती हवा मिळत नाही. जागोजागी झोपडपट्टी निर्माण झाली आहे. शहर नियोजनाचा बट्ट्याबोळ झाला असून या परिस्थितीला इथले बिल्डर आणि आर्किटेक्ट जबाबदार आहेत, अशा शब्दात टाटा समुहाचे अध्यक्ष व उद्योगपती रतन टाटा यांनी बिल्डर आणि आर्किटेक्ट यांना सुनावले. 

जगभरातील कॉर्पोरेट आणि स्टार्टअप व्यावसायिकांना एकत्र आणणाऱ्या ‘कॉर्पगिनी‘ या अमेरिकन  कंपनीने ‘भविष्यातील बांधकाम आणि आराखडा‘ या विषयावर आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये रतन टाटा सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले की, कोरोनामुळे कमी किमतीत निर्माण झालेल्या झोपडपट्ट्यांची खरी बाजू आता समोर आली आहे. या कमी किमतीमधील निवाऱ्यांमधून कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. ज्या ठिकाणी झोपडपट्ट्या वसल्या आहेत तिथे पुनर्विकासातून या बिल्डरांची उखळ पांढरी झाली आहेत. बिल्डरांनी नियोजनाचा बोजवारा उडवून बक्कळ पैसा कमवला आहे.  वास्तुरचनाकार आणि विकासक यांनी आपण जे चुकीचे करीत आहोत त्यात बदल करावा. मुंबई, महाराष्ट्रात बदल घडत आहे. परंतु हा बदल कृत्रिम नव्हे तर अस्सल हवा, अशी अपेक्षाही टाटा यांनी व्यक्त केली.

टाटा म्हणाले की, आम्हाला झोपडपट्टी मुक्त शहर करायचं आहे. मात्र पुनर्विकासात येथेही स्थानिकांना २० ते ३० मैल दूर विस्थापित करावे लागे., मात्र त्या ठिकाणी त्यांना नोकऱ्या उपलब्ध नाहीत. झोपड्पट्टीमधील छोट्या हिश्शात पुनर्विकास केला जात आहे. त्यामुळे घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.


हेही वाचा -

मुंबईत ३०३२ कोरोना रुग्ण, महाराष्ट्रात आढळले ४६६ नवे रुग्ण

रॅपिड टेस्ट करण्यास केंद्र सरकारची परवानगी


पुढील बातमी
इतर बातम्या