मुंबई महापालिकेत १८५० ते २०७० जागांसाठी भरती, २ लाखांपर्यंत पगार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई महापालिका अंतर्गत विविध पदांच्या १८५० ते २०७० जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जून २०२१ आहे.

पदाचे नाव आणि  जागा :

१) वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार, इंटेस्टिव्हिस्ट (एमडी मेडिसिन), अनेस्टस्ट (एमडी), नेफ्रोलॉजिस्ट (डीएम कार्ड), ओलॉजिस्टन, न्यूरोलॉजिस्ट (डीएम) – ५० ते ७०

२) सहाय्यक वैद्यकीय अधिकारी MBBS, BAMS, BHMS – ९०० ते १०००

३) प्रशिक्षित अधिपरिचारिका- ९०० ते १०००

शैक्षणिक अर्हता :

पद क्र. १ : १ . उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक/अतिविशेषकृत शाखेचा पदवीधारक असावा.

२. उमेदवार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अथवा भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा नोंदणीकृत असावा.

पद क्र. २ : १. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक शाखेचा पदवीधारक असावा.

२. उमेदवार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा अथवा योग्य संस्थेचा (आयुर्वेद व होमिओपॅथिक संस्थेचा नोंदणीकृत असावा)

पद क्र. ३ : १. उमेदवार जीएनएम मान्यताप्राप्त नर्सिंग कॉन्सिलचा पदविकाधारक असावा.

२. उमेदवार योग्य त्या नर्सिंग काऊन्सिचा नोंदणीकृत असावा.

वयोमर्यादा : दि. ०९.०६.२०२१ रोजी १८ वर्षापेक्षा कमी व ३३ वर्षापेक्षा अधिक नसावे.

मानधन /PayScale :

१) वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार – १,५०,००० ते २,००,०००/-

२) सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – ५०,००० ते ८०,०००/-

३) प्रशिक्षित अधिपरिचारिका- ३०,०००/-

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल – covid19mcgm@gmail.com/ stenodeanl@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ जून २०२१ 

* सर्वसाधारण अटी

१. उमेदवारांनी विवाहनोंदणी प्रमाणपत्र, नावात बदल झाल्याचे राजपत्र सादर करावे. तसेच ते नसल्यास विवाहित महिला उमेदवारा विवाहापूर्वीच्या नावाने अर्ज करू शकतात.

२. उमेदवाराला कोणत्याही न्यायालयाने नैतिक अधपतन किंवा फौजदारी स्वरूपाच्या खटल्यात शिक्षा दिली असल्यास, तसेच उमेदवारविरुद्ध पोलीस चौकशी/ न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्यास/ शिक्षा झालेली असल्यास उमेदवाराने त्याबाबत माहिती देणे आवश्यक आहे.

३. निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेवाराने कुकीची माहिती /प्रमाणको कागदपत्रे सादर केल्यास किंवा कोणतीही माहिती दडवून ठेवल्यास निदर्शनास आल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल.

४. उमेदवार नोकरी करीत असल्यास पूर्वीच्या नियोक्त्यांचे ना- हरकत प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे.

५. प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव निवड प्रक्रिया कोणत्याही वेळेस कोणत्याही टप्पावर थांबविण्याचे अधिकार महापालिका आयुक्त यांना आहेत.

६. उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल

७. निवड झालेल्या उमेदवारांस रुपये १०० /- किंवा विधि आकाराप्रमाणे (वेतन मिळतीनुसार) ब्रान्ड पेपरवर विहित नमुन्यातील कंत्राट करार करणे आवश्यक असून सदरहू खर्च संबधित उमेदवारास करावा लागेल.

८.कुठल्याही कारणास्तव निवड झालेल्या उमेदवारास पदाचा राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने ३० दिवसांची पूर्वसूचना देणे बंधनकारक

अधिकृत संकेतस्थळ : portal.mcgm.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी  : येथे क्लिक करा



हेही वाचा - 

कांदिवलीतील ‘त्या’ संशयास्पद लसीकरण प्रकरणाची होणार सखोल चौकशी

माजी एनकाऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा NIAच्या ताब्यात, चौकशी सुरू

पुढील बातमी
इतर बातम्या