आरजे मलिष्का नवरीच्या वेशात रस्त्यांवर का फिरतेय? पाहा धक्कादायक व्हिडिओ

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई तुझा बीएमसीवर भरवसा नाय का? या गाण्याद्वारे आरजे मलिष्का चर्चेत आली. या गाण्याद्वारे तिनं मुंबईतील खड्ड्यांची परिस्थिती मांडत मुंबई महापालिकेवर आगपाखड केली होती. त्यानंतर 'सैराट' चित्रपटातील 'झिंग झिंगाट' या गाण्यावर आधारीत 'गेली गेली मुंबई खड्ड्यात' हे गाणं आणलं होतं. आता आरजे मलिष्का पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती तिच्या आणखी एका गाण्यामुळे. मलिष्कानं आता चाँद जमीन पर या टायटल अंतर्गत नवीन गाणं प्रदर्शित केलं आहे

'हम चाँद पर पहुँच गए लेकिन क्या आपको पता है चाँद भी हमतक पहुँच चुका है,' या वाक्यानं गाण्याची सुरुवात होते. त्यानंतर नटलेल्या एखाद्या नवरीसारखी मलिष्का भर रस्त्यात उभी असलेली दिसते. तिच्या हातात चाळणी असून या चाळणीतून ती खड्ड्यांना पाहत आहे. खड्ड्यांसोबत ती एकप्रकारे करवा चौथ साजरा करतेय. 'देखो चाँद आया चाँद नजर आया' हे गाणं बॅकग्राऊंडला वाजत आहे. मुंबईतील खड्ड्याचं आणि आपलं सात जन्माचं नातं आहे, हे देखील मलिष्कानं म्हटलंय.

आरजे मलिष्कानं तिच्या फेसबुक पेजवर गाणं शेअर केलं असून सोशल मीडियावर हे गाणं चांगलंच व्हायरल होत आहे. मलिष्काच्या या गाण्यावर शेअर आणि लाइक्सचा पाऊस पडत आहे. मलिष्कानं या गाण्यामार्फत पालिका आणि बांधकाम विभागाच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्चचिन्ह उपस्थित केलं आहे

आतापर्यंत मलिष्कानं खड्ड्यांवर भाष्य करणारे तीन व्हिडिओ काढले. तिन्ही व्हिडिओमध्ये मलिष्कानं पालिकेला टार्गेट केलं आहे. पुन्हा एकदा मलिष्कानं खड्ड्यांच्या मुद्द्यावरून पालिकेवर आगपाखड केली आहे. आता मलिष्काच्या या गाण्याला पालिका कसं? आणि काय? उत्तर देते हे पाहण्यासारखं आहे.


 

पुढील बातमी
इतर बातम्या