शिवडी-चेंबूर हायवेला हुतात्म्याचं नाव

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

शिवडी - शिवडी-चेंबूर हायवेला जोडणाऱ्या रस्त्याचं गुरुवारी नामकरण करण्यात आलं. या रस्त्याला हुतात्मा करपैय्या किरमल देवेंद्र यांचं नाव देण्यात आलंय. करपैय्या किरमल देवेंद्र हे 1956 साली झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्मा झाले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तामिळनाडू टीएमएमके पक्षाचे अध्यक्ष ज्वान पांडियन यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. नामकरण कार्यक्रमाला काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार वर्षा गायकवाड, मुंबई एस.सी.सेलचे अध्यक्ष कचरू यादव, हुकुमराज मेहता, स्थानिक नगरसेविका ललिता यादव यांच्यासह अनेक काँग्रेसचे पदाधिकारी आणि तामिळ भाषिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या