मुंबई : 'मेट्रो 3'च्या कामामुळे आरेतील रस्त्याची दुरवस्था

Representational Image
Representational Image
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

'कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3' (metro 3) प्रकल्पातील कारशेड (carshed) आरे कॉलनीत उभारण्यात आले आहे. त्यामुळे आरे (aarey) कॉलनी आणि अंधेरी पूर्वेला जोडणारा मरोळ-मरोशी रस्ता परिसर तसेच मुख्य रस्त्याची दुरवस्था झाल्याचा आरोप स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

तसेच आरे आणि पवईला जोडणाऱ्या भागात पाणी साचले आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी पाणी साचते ते आरेतील कारशेडपासून खूप दूर असल्याचा दावा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे.

आरे कॉलनी रोड आणि कारशेड साईट दोन्ही सखल भागात आहेत. कारशेड बांधण्यासाठी 33 हेक्टर क्षेत्रात लँडफिलिंगची कामे करण्यात आली आहेत. तसेच कारशेडच्या हद्दीत भिंत उभारण्यात आली आहे. तसेच एमएमआरसीएलने हा नाला वळवल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून हा रस्ता पाण्याखाली गेल्याचा आरोप 'सेव्ह आरे'च्या अमृता भट्टाचार्य यांनी केला आहे.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे पवई (powai) आणि मरोळहून आरेकडे जाणारे दोन्ही रस्ते जलमय झाले आहेत. आरेतील रहिवाशांना कामावर आणि बाजारात जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करावा लागतो. तसेच, या प्रकल्पाचा आरेमधील आदिवासींच्या घरांवर आणि उपजीविकेवर परिणाम होत असल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.


हेही वाचा

Mumbai Rains : मुंबईकरांनो लक्ष द्या! आज ऑरेंज अलर्ट जारी

सायन ब्रिजवरील वाहतूक जुलै 2026 पर्यंत बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

पुढील बातमी
इतर बातम्या