आरे डेअरी कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांचे काम पूर्ण होऊन दोन महिनेच पूर्ण झाले आहेत. इतक्यातच पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यात हा रस्ता खड्डेमय झाला आहे. दरम्यान, रस्ता दुरुस्तीच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
आरे मार्केट ते रॉयल पाम्स हा रस्ता मे महिन्यात बांधण्यात आला होता. दरम्यान, आरे डेअरी कॉलनीतील अंतर्गत रस्ताही खड्डेमय झाल्याकडे स्थानिकांनी लक्ष वेधले. रहिवाशांना खराब रस्त्यावरून प्रवास करावा लागतो, हे लक्षात घेऊन मे महिन्यातच या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती.
दरम्यान, जूनच्या सुरुवातीच्या दिवसात झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर खड्डे पडू लागले आहेत. रस्त्याच्या सद्यस्थितीनुसार रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले आहेत. या निकृष्ट कामाला संबंधित अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार आहेत.
दरम्यान, आरे डेअरी कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था असल्याचे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला तातडीने दुरुस्ती आणि देखभालीची कामे हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत. आरे डेअरी कॉलनीमध्ये 27 आदिवासी पाड्यांचा समावेश आहे. ज्यात एक गोठा आणि रॉयल पाम्सचा परिसर आहे.
हेही वाचा