एसबीअायचे ग्राहक आहात, तर मग ही बातमी वाचा

जर तुमचं खातं स्टेट बँक अाॅफ इंडिया (एसबीअाय) मध्ये असेल अाणि तुम्ही इंटरनेट बँकिंगचा उपयोग करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची अाहे. नेटबँकिंगचा उपयोग करणाऱ्या खातेधारकांना १ डिसेंबरपर्यंत अापला मोबाइल क्रमांक बँकेत नोंदवावा लागणार अाहे. जर मोबाइल क्रमांक बँकेत नोंदवला नाही तर तुमची नेट बँकिंगची सुविधा रद्द होईल.

अारबीअायचे निर्देश 

एसबीअायने अापल्या इंटरनेट बँकिंग वेबसाइटवर अापल्या खातेधारकांना ही माहिती दिली अाहे. खातेधारकांनी १ डिसेंबरपर्यंत मोबाइल क्रमांक नोंदवला नाही तर त्यांना नेट बँकिंग वापरता येणार नाही. जर खातेधारकाचा मोबाइल क्रमांक अगोदरच नोंदवला गेला असेल तर त्यांना काहीच करण्याची गरज नाही. ग्राहकांना एसएमएस आणि ई-मेल अलर्टसाठी मोबाइल क्रमांक नोंदवण्यास सांगा, असे निर्देश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सर्व बँकांना ६ जुलै २०१७ रोजी दिले होते.

एटीएम व्यवहारावर मर्यादा

एसबीअायने नुकतंच एटीम व्यवहारात होत असलेला गैरव्यवहार लक्षात घेऊन व्यवहारांवर मर्यादा अाणली अाहे. नवीन नियमानुसार, अाता खातेधारकांना एटीएममधून एका दिवसात जास्तीत जास्त २० हजार रुपयेच काढता येणार अाहेत. सध्या एटीएममधून एका दिवसात जास्तीत जास्त ४० हजार रुपये काढता येतात. नवीन नियम ३१ अाॅक्टोबरपासून लागू होणार अाहे. 


पुढील बातमी
इतर बातम्या