नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात आगीच्या ७ घटना, ५ जणांचा गेला जीव

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मोसम भलेही थंडीचा असो, पण मुंबईकरांसाठी नव्या वर्षाची सुरूवात धगधगती अन् काही जणांच्या मनाला चटका लावणारी झाली आहे. वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात शहरात ठिकठिकाणी ७ ठिकाणी आग लागल्याचे प्रकार घडले. या दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

सन २०१७ संपता संपता अंधेरीतील साकीनाका आणि कमला मिल्स कंपाऊंडसारख्या मोठ्या आगीच्या घटनांनी मुंबईकर हादरून गेले. नवं वर्ष मुंबईकरांसाठी सुखवार्ता घेऊन येणारं ठरेल, अशी अपेक्षा असताना २०१८ च्या सुरूवातीलाच अंधेरीतील मरोळमध्ये पुन्हा एकदा अग्नितांडव झालं. या आगीत ४ जणांना जीव गमवावा लागला. तर पहिला आठवडा संपताना कांजूरमार्ग येथील सिनेव्हिस्टा स्टुडिओला लागलेल्या आगीत एका आॅडियो अस्टिस्टंटचा मृत्यू झाला.

आगीच्या ७ घटना अशा

  1. अंधेरीतील मरोळमधील मैमून मेन्शन या इमारतीला ४ जानेवारी २०१८ राेजी आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाला.
  2. विलेपार्लेतील प्राईम माॅलमध्ये दुपारच्या वेळेत आग लागली. ही आग ४ जानेवारीला लागली. ही आग लहान असल्याने ती पटकन विझवण्यात आली.
  3. मुंबई सेंट्रलमधील जीया अपार्टमेंटमध्ये शुक्रवार ५ जानेवारीला दुपारी आग लागली. बेसमेंटमधील सामानाला ही आग लागल्याने या आगीत संपूर्ण सामान जळून खाक झाले.
  4. त्याच दिवशी म्हणजे ५ जानेवारीला सायंकाळी सायनच्या प्रतिक्षा नगरमधील म्हाडा काॅलनीत आग लागली. या आगीत एका इमारतीतील ४ फ्लॅट पूर्णपणे जळाले. सुर्दैवाने या आगीत कुणालाही दुखापत झाली आहे.
  5. शनिवारी ६ जानेवारीला दिवसभर कुठेही आग लागल्याची घटना घडली नसली, तरी रात्री कांजूरमार्गच्या सिनेव्हिस्टा स्टुडिओला लागली. आग लागली तेव्हा स्टुडिओत बेपनाह मालिकेचं शुटींग सुरू होतं. त्यावेळी तिथं १५० जण उपस्थित होते. पण अग्निशमन दलाच्या जवानांनी या सर्वांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. परंतु दुर्दैवाने या आगीत एका आॅडियो अस्टिस्टंटचा मृत्यू झाला.
  6. लोअर परळच्या शिवशक्ती इमारतीत ६ जानेवारीलाच आग लागली. या आगीत कुणालाही दुखापत झाली नाही.
  7. त्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा म्हणजेच ८ जानेवारीला सत्र न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर पुन्हा आगीची घटना घडली. ही आग सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडल्याने तिथं कुणीही उपस्थित नव्हतं. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.


हेही वाचा-

बंद दाराआड जीवन मृत्यूचा दाहक खेळ! एका कुटुंबानं सर्वस्व गमावलं, तर दुसऱ्याला मिळालं जीवनदान!!

मुंबई सत्र न्यायालयाच्या इमारतीला आग

कांजूरमार्गचा सिनेव्हिस्टा स्टुडिओ जळून खाक, एकाचा मृत्यू

कमला मिलमधील 'ती' आग हुक्क्यामुळेच!


पुढील बातमी
इतर बातम्या