धारावीतील 'या' कामगारांना अन्नधान्याचे वाटप

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

लॉकडाऊनच्या परिस्थितीत रोजंदारीचे काम नसल्यानं हाती पैसा नाही. खायला अन्न नाही आणि आपल्या गावी परतावं, तर प्रवासाचं साधन नाही, अशा दुष्टचक्रात मुंबईतील नाका कामगार फसले आहेत. तशीच गत घरकाम करणाऱ्या महिलांची झाली आहे. त्यामुळं आता या कामगारांच्या मदतीसाठी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी पुढाकार घेतला आहे. 

काम नसल्यानं उपाशी राहायची वेळ आलेल्या धारावीतील नाका कामगार आणि घरकाम करणाऱ्या अशा १०० नाका कामगारांना आणि महिलांना अन्नधान्याचं वाटप करण्यात आले. ही मदत येत्या काळात आणखी वाढवली जाणार असल्याची माहिती खासदार शेवाळे यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. 

राज्यात कोरोनाचे २२ नविन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळं एकूण रुग्ण संख्या २०३ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १० रुग्ण मुंबईचे असून ५ रुग्ण पुण्याचे, ३ नागपूरचे, २ अहमदनगरचे तर सांगली, बुलढाणा आणि जळगाव येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. दरम्यान, करोना आजारातून बरे झालेल्या एकूण ३५ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. 

अनेक नेते व समाजसेवक या संकटसमयी भुकेलेल्यांची मोठी मदत करत आहेत. काही जण आपल्या शेतीतील पीक मोफत देत आहे. तर काही जण जेवणाची व्यवस्था करत काहींच्या निवाऱ्याचीही जबाबदारी घेत आहे. त्यामुळं आता या कोरोना व्हायरसमुळं हतबल झालेल्या नागरिकांना मदत करणाऱ्यांचे आभार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले आहेत. 


हेही वाचा -

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी ऑनलाईन ई-पास

मध्यरात्री लपून उत्तर प्रदेशात निघालेल्या कामगारांच्या ट्रकवर पोलिसांची कारवाई


पुढील बातमी
इतर बातम्या