नवीन वर्ष आणि नाताळ या दोन्ही दिवशी दारू पिणाऱ्यांची संख्या वाढते. अशा मद्यप्रेमींसाठी आता सरकारने चिअर्स केलं आहे. नवीन वर्ष आणि नाताळनिमित्ताने राज्यातील दारूची दुकाने तसंच पब आणि बार पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत. कायदा आणि सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता लक्षात घेऊन परवानगी नाकारण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे
अनेकजण मद्य पिऊन नव वर्षाचे स्वागत करत असतात. या काळात सर्वाधिक माद्याविक्री होते. 24, 25 आणि 31 डिसेंबर रोजी पहाटेपर्यंत दारू मिळणार आहे. बीअर/ वाइन विकणाऱ्या दुकानांना सकाळी 1 वाजेपर्यंत विक्रीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. FLBR-II परवानाधारकांसाठीही अशीच मुदतवाढ देण्यात आली.
नवीन वर्ष आणि नाताळ या दोन्ही दिवशी दारू पिणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. याच मद्यप्रेमींना सरकारकडून चिअर्स करण्यात आलेय. ख्रिसमस आणि थर्टी फस्टच्या निमित्ताने राज्यातील दारूची दुकाने, पब आणि बार यांच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गृह विभागाने याबाबतचे महत्त्वाचे आदेशही जारी करण्यात आलेत.
गृह विभागाच्या आदेशानुसार, 24 डिसेंबर, 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर असे तीन दिवस दारूची दुकानाची वेळ वाढवण्यात आली आहे. दारूची दुकाने रात्री एक वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर पब आणि बार यांना पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यविक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सरकारी परवान्यानुसार दारूची दुकाने सुरू ठेवण्याबाबत राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.
हेही वाचा