मुंबईत इमारतीचा स्लॅब कोसळला, वयोवृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईच्या मुलुंड पूर्वेकडील नाणेपाडा परिसरात असलेल्या मोती छाया इमारतीच्या घरातील स्लॅब कोसळून दोन वरिष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या इमारतीमध्ये दोन कुटुंबे वास्तव्यास होती.

‘ग्राउंड प्लस टू’ असं या इमारतीचं स्ट्रक्चर होतं. या दुर्घटनेत इमारतीत राहणाऱ्या देवशंकर शुक्ला (वय-९३) आणि आरखी शुक्ला (वय-८७) या दाम्पत्याचा या दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेचे आपत्कालीन पथक तसेच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जखमी दाम्पत्याला जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

परंतु त्याठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आलं. विशेष म्हणजे ही इमारत पालिका प्रशासनाकडून धोकादायक म्हणून घोषित केली होती. तरीदेखील काही कुटुंबं या इमारतीमध्ये वास्तव्यास होते. या दुर्घटनेनंतर सर्वांना इमारतीतून इतर ठिकाणी हलवण्यात आलं आहे.


हेही वाचा

ठाणे, कल्याण-डोंबिवलीत स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये वाढ

कोरोनाचा धोका पुन्हा वाढला, मुंबईतील रूग्णांच्या संख्येत 80 टक्के वाढ

पुढील बातमी
इतर बातम्या