मुनगंटीवार देणार पालिकेला 700 कोटींचा 'हप्ता'

  • सचिन धानजी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

जकात कर बंद होऊन चार दिवस उलटत नाही, तोच जीएसटीचा पहिला हप्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महापालिकेला जीएसटीचा पहिला हप्ता म्हणून 700 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

जीएसटी लागू झाल्यामुळे महापालिकेचा आर्थिक डोलारा कोसळू नये, म्हणून राज्य सरकारने महापालिकेला आगाऊ रक्कम देण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षाच्या उत्पन्नाच्या आधारे ही सरासरी रक्कम महापालिकेला पुढील पाच वर्षे दिली जाणार आहे.

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार येत्या बुधवारी दुपारी साडेबारा वाजता मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना या निधीचा धनादेश सुपूर्द करणार आहेत. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील उपस्थित राहणार आहेत.

मुंबईत 1 जुलैपासून वस्तू व सेवा कर लागू झाल्याने महापालिकेचा जकात कर बंद झाला आहे. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नाचा मोठा स्त्रोत बंद झाला आहे.
त्याची भरपाई सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी खुद्द अर्थमंत्री मुनगंटीवार बुधवारी 5 जुलैला मुंबई महापालिकेची पायरी चढणार आहेत.


मुंबईच्या विकासासाठी दिलेले वचन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळले आहे. नुकसान भरपाईचा पहिला हप्ता 700 कोटींचा असेल. बुधवारी 5 जुलैला दुपारी 12.30 वाजता अर्थमंत्री महापालिका मुख्यालयात येऊन महापौरांकडे ही रक्कम सुपूर्द करतील. जीएसटी लागू झाल्यामुळे कुठेही महापालिकेच्या आर्थिक स्वयत्ततेला धोका पोहोचणार नाही याची खबरदारी सरकारकडून घेतली जाईल.


- मनोज कोटक, भाजपा गटनेते

जीएसटीसंदर्भात जनतेमध्ये संभ्रमावस्था असताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यातील काही तांत्रिक बाबी स्पष्ट करणारी पोस्ट त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केली आहे.



हे देखील वाचा -

अर्थमंत्री मुंबई महापालिकेच्या दारी! जीएसटीचा पहिला हप्ता देणार

जकात कर्मचारी आता 'बिनकामाचे'


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

पुढील बातमी
इतर बातम्या