लवकरच माहीम चौपाटीवर सागरी पोलीस ठाणे

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

माहीम - गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या माहीम चौपाटीवरील सागरी पोलीस ठाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पोलीस ठाण्याच्या बांधकामाला केंद्र शासनाकडून परवानगी देण्यात आली असून, लवकरच सागरी पोलीस ठाण्याच्या पक्क्या बांधकामाला सुरुवात होणार आहे.

याबाबत मुंबई सागरी -1 पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय करंबे यांच्याशी चर्चा केली असता 'माहीम चौपाटीवर अद्यावत सागरी पोलीस इमारत बांधल्याने मुंबईच्या पश्चिम समुद्र किनाऱ्याला अद्यावत सुरक्षा मिळणार असून, सागरी सुरक्षा बळकट होणार आहे. या इमारतीत समुद्रमार्गे होणाऱ्या हल्ला परतून लावण्याची अद्यावत यंत्रणा बसविण्यात येणार आहे', असे त्यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या