विवाहबाह्य संबंध अपराध नाही, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पती हा पत्नीचा मालक होऊ शकत नाही. महिला आणि पुरुषांना समान अधिकार आहेत. त्यामुळे महिलांचा सन्मान करायला हवा, असं सांगतानाच व्याभिचार अर्थात विवाहबाह्य संबंध अपराध ठरू शकत नाही, असा ऐतिहासिक निकाल गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

कलम ४९७ रद्द

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश एम. खानविलकर, आर. एफ. नरीमन, डी. वाय. चंद्रचूड आणि इंदू मल्होत्रा या पाच सदस्यांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे. मूळचे भारतीय असलेले इटलीतचे नागरिक जोसेफ शाइन यांनी कलम ४९७ रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.

भारतीय दंड संहिते(आयपीसी)चं कलम ४९७ हा महिलांच्या सन्मानाविरोधात असल्याचं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने हे कलम अवैध ठरवलं आहे. स्त्रीयांचा सन्मान आवश्यक असल्याचं मत यावेळी सर्वोच्च न्यायालयानं मांडलं. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांनी हे कलम रद्द केलं.

हा गुन्हा नाहीच

समाजात स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समान दर्जा, समान अधिकार आहेत. त्यामुळे महिलांचा सन्मान करायला हवं. संसदेनेही महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर आळा बसावा यासाठी कौटुंबीक हिंसाचारविरोधी कायदा मंजूर केला आहे. त्यामुळे पती हा पत्नीचा मालक होऊ शकत नाही. तसंच विवाहबाह्य संबंध हे घटस्फोटाचं कारण ठरू शकतं, मात्र तो गुन्हा ठरणार नाही, असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या