ऑनलाइन सीएनजी बुकिंगला टॅक्सी, रिक्षाचालकांचा विरोध

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी बुकिंगसाठी अाॅनलाइन सुविधा सुरू केली अाहे. याअंतर्गत अाता रिक्षा, टॅक्सी अाणि इतर वाहनधारकांना सीएनजी भरण्यासाठी अाॅनलाइन बुकिंग करता येणार अाहे. मात्र, अाॅनलाइन बुकिंगला टॅक्सी चालकांच्या संघटनेने विरोध केला अाहे. बहुतांशी रिक्षा अाणि टॅक्सी चालकांकडे स्मार्टफोन नाहीत. त्यामुळे अाॅनलाइन बुकिंग कसं करतात याची त्यांना माहिती नाही, असं संघटनेचं म्हणणं अाहे. 

१३ डिसेंबरला अांदोलन

 अाॅनलाइन बुकिंगविरोधात टॅक्सी चालक १३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता बांद्रा - कुर्ला काॅम्पलेक्समधील महानगर गॅस लि. च्या कार्यालयासमोर अांदोलन करणार अाहेत. रिक्षाचालकही या अांदोलनात सहभागी होणार अाहेत. 

निर्णय चुकीचा

संघटनेचे महासचिव व ए.एल. क्वाड्रोस यांनी याबाबत म्हटलं की, अाॅनलाइन सीएनजी बुकिंगचा निर्णय चुकीचा अाहे. यामुळे टॅक्सी अाणि रिक्षाचालकांचा सीएनजी भरण्यासाठी अधिक वेळ वाया जाणार अाहे. शहरात ३ लाखांपेक्षा अधिक सीएनजी ग्राहक अाहेत. त्यांच्यासाठी फक्त १३५ सीएनजी पंप अाहेत. त्यामुळे सीएनजी भरण्यासाठी ३ तासापेक्षा अधिक वेळ लागेल. 


हेही वाचा - 

एसटीतील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग सुकर; लिपिक-टंकलेखक संवर्गात २५ टक्के आरक्षण


पुढील बातमी
इतर बातम्या