ऑक्टोबर उकाड्याची मुंबईकरांना जाणीव

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातील जोरदार हजेरी लावलेल्या पावसानं सध्या मुंबईसह उपनगरात विश्रांती घेतली आहे. पावसाच्या विश्रांतीनंतर मुंबईकरांना उन्हाचा ताप जाणवू लागला आहेमुंबईमध्ये ऑक्टोबर सुरू झाल्यापासून ३ दिवसांमध्ये १ मिलिमीटर पाऊस पडलेला असून या दिवसांत मुंबईकरांना उन्हाचा ताप जाणवू लागला आहेमागील आठवड्यापासून मुंबईचे तापमान हळूहळू चढायला सुरुवात झाली होती

पावसाची विश्रांती 

मुंबईकरांना उन्हाच झळ लागत असली तरी अद्याप पावसानं माघार घेतली नाही. दरम्यान, आर्द्रतेचे प्रमाण जास्त असून, वाढलेलं तापमान आणि आर्द्रतेमुळं मुंबईकरांना गुरुवारी अचानक काहिलीची जाणीव झाली. सध्या मुंबईकरांना घामाच्या धारा जाणवायला लागल्या नसल्या तरी उन्हाचे चटके बसत आहेत.

तापमानात वाढ 

मागील आठवड्यापासून मुंबईचं तापमानात वाढ होत आहे. परंतु, याकालावधीत पावसाची उपस्थिती असल्यानं तापमानाचा चटका फारसा जाणवत नव्हता. मात्र, बुधवारपासून तापमानात आणखी वाढ झाल्यानं मुंबईकरांना चटके बसत आहेत. गुरुवारी सांताक्रूझ इथं ३२.४ आणि कुलाबा इथं ३२.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

पुन्हा पाऊस

अरबी समुद्रात मान्सून आता क्षीण ते मध्यम स्वरूपाचा आहे. मात्र पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये सोमवार आणि मंगळवारी दक्षिण आणि उत्तर कोकणामध्ये अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.


हेही वाचा -

मध्य रेल्वेवरील सीएसएमटी स्थानक ‘पर्यावरणस्नेही’

आरे कॉलनीत कारशेड होणार? शुक्रवारी समजणार अंतिम निकाल


पुढील बातमी
इतर बातम्या