ठाणे : गायमुख येथील श्री गणेश विसर्जन घाटाचे उद्घाटन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

घोडबंदर रोड येथील नागला बंदर खाडी विकास प्रकल्पांतर्गत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौपाटीजवळील गणेश विसर्जन घाट आणि दशक्रिया विधी घाटाचे उद्घाटन आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झाले.

यावेळी ठाणे महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती संजय भोईर, माजी नगरसेविका साधना जोशी, नम्रता घरत आणि सिद्धार्थ ओवळेकर, स्मार्ट सिटीचे सीईओ आणि ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे उपस्थित होते. .

गायमुख येथील नागला बंदराजवळ गणेश विसर्जन घाट आणि दशक्रिया विधी घाट बांधण्यात यावा, अशी स्थानिक रहिवाशांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्यानुसार केंद्र सरकार, राज्य सरकार आणि ठाणे पालिका यांच्या अनुदानातून स्मार्ट सिटी प्रकल्प विकसित करण्यात आला.

ठाणे महापालिकेने नागरिकांची मागणी मान्य करत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचा फायदा गायमुख, कासारवडवली, ओवळा, मोघरपाडा व परिसरातील नागरिकांना होणार आहे. तसेच या ठिकाणी आवश्यक त्या सुविधाही ठाणे महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.


हेही वाचा

पुढील बातमी
इतर बातम्या