मुंबईतल्या 'या' वॉर्ड्समध्ये सर्वाधिक कोविड रुग्णांची नोंद

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

एच वेस्ट (वांद्रे) आणि के वेस्ट(अंधेरी) या प्रभागांमध्ये कोविड-19 पॉझिटिव्ह प्रकरणांमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली गेली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कोविड-19 डॅशबोर्डवर आधारित, एच पश्चिम वॉर्ड ज्यामध्ये वांद्रे, खार आणि सांताक्रूझचा समावेश आहे. तसंच, अंधेरी पश्चिम आणि विलेपार्ले यांचा समावेश असलेल्या के पश्चिम वॉर्डमध्ये कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणांचा सर्वाधिक वाढीचा दर अनुक्रमे १.७१ आणि १.६७ टक्के आहे.

मुंबईच्या १.२२ टक्‍क्‍यांच्‍या सरासरी वाढीच्‍या तुलनेत हा दर अधिक आहे. तथापि, प्रशासकिय अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, पॉझिटिव्ह केसेसमध्ये वाढ पाहता घाबरण्याची गरज नाही. कारण बहुतेक प्रकरणं इमारतींमध्ये राहणाऱ्यांमध्ये आहेत आणि त्यांच्यात सौम्य लक्षणं आहेत. सौम्स लक्षणं असल्यानं होम क्वारंटाईनचा पर्याय बरेच जण निवडत आहेत.

प्रशासकिय अधिकाऱ्यानं सांगितलं की, त्यांच्या फ्लॅट आणि जवळपासच्या क्षेत्राची स्वच्छता त्यांचं विलगीकरण झाल्यानंतर केली जाते.

याशिवाय के पश्चिम प्रभागातही अशीच परिस्थिती कायम आहे. दुसरीकडे, अनेकांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे घेण्यापूर्वी सकारात्मक चाचणी केली आहे.

प्रशासकिय संस्थेनं नुकतीच घरगुती चाचणीचे निरीक्षण करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. याच्या अनुषंगानं, ज्या रुग्णांची रॅपिड अँटीजेन चाचणी (आरएटी) किंवा होम टेस्ट किटचा वापर करून चाचणी केली जाते त्यांचे परिणाम संबंधित प्रयोगशाळेद्वारे किंवा व्यक्तीद्वारे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला कळवले जातात.


हेही वाचा

ओमिक्रॉनवर लवकरच लस उपलब्ध होऊ शकते

पालिकेनं उभारला मुंबईत जम्बो ऑक्सिजन प्लांट, जाणून घ्या वैशिष्ट्ये

पुढील बातमी
इतर बातम्या