विकेंडला खडकवासला धरणावर जायचा प्लॅन करताय? मग 'हे' वाचाच

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वीकेंडला म्हणजेच शनिवारी आणि रविवारी खडकवासला धरण तसेच सिंहगड किल्ला पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. तुम्ही देखील असा काही प्लॅन करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. 

पुण्यातील खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या नऊ तरुणी बुडाल्याची घटना समोर आली होती. त्यात दोन मुलींचा मृत्यू झाला तर सात मुलींना वाचवण्यात यश आलं. त्यानंतर आता पर्यटकांना खडकवासला धरणात पोहण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

पुण्यातील जलसंपदा विभागाने पर्यटकांनासह स्थानिकांना खडकवासला धरणात उतरण्यास बंदी घातली आहे. नियम मोडणाऱ्यांव ५०० रुपये दंडासह कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा विभागाकडून देण्यात आला आहे.

तसेच खडकवासला धरण परिसरात नियमावलींचा फलक लावून दहा पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. 

सोमवारी नऊ तरुणी धरणात बुडाल्याची घटना समोर आल्यानंतर आता जलसंपदा विभागाने पर्यटकांना खडकवासला धरणात उतरण्यास बंदी घातली आहे. याशिवाय पोहण्यासाठी धरणात उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्यांकडून ५०० रुपयांचा दंड आणि पोलीस कारवाई केली जाणार असल्याचे फलक चौपाटीवर लावण्यात आले आहे. त्यामुळं आता ऐन उन्हाळ्यात खडकवासला धरणात मोठी घटना घडल्यामुळं पर्यटकांची निराशा झाली आहे.

जलसंपदा विभाग आणि स्थानिक पोलीस खडकवासला धरणाच्या चौपाटीवर लक्ष ठेवून आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या