मुंबई के गटर बंद रहे तो बेटर

  • प्रसाद कामटेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

लोअर परळ - तुळसी पाइप मार्गावरील गटाराचे झाकण तुटलेल्या अवस्थेत आहे. या तुटलेल्या गटारात ट्रकचे चाक अडकले. या ट्रकचे चाक काढण्यासाठी वाहतूक पोलीस आणि नागरिकांची चांगलीच दमछाक झाली. या मार्गावर चार महिन्यांपूर्वी रस्त्याचं काम करण्यात आलं होतं. त्यावेळी या गटारावर नवीन सिमेंटचं झाकण बसवण्यात आलं होतं. मात्र या झाकणाची तीन महिन्यातच दुरवस्था झाली. पालिकेकडे तक्रार करूनही दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय. या तुटलेल्या झाकणामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. अपघात झाल्यास पालिका याची जबाबदारी घेणार का? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला.

पुढील बातमी
इतर बातम्या