२ दिवस भारत बंद, मुंबईत सर्व सुरळीत

(Representational Image)
(Representational Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

२८ आणि २९ मार्च रोजी विविध कामगार संघटनांनी देशव्यापी भारत बंदची हाक दिली आहे. मात्र, या बंदचा परिणाम मुंबईत फारसा दिसून येत नाही आहे. मुंबईत बस आणि लोकल ट्रेन सेवा सुरळीत सुरू झाल्या आहेत. तीच दुकानंही रोजप्रमाणे उघडलेली आहेत.

आज आणि उद्या भारत बंद असणार आहे. रेल्वे, रस्ते, वाहतूक आणि वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही या भारत बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या संपाला बँक कर्मचाऱ्यांनीही पाठिंबा दिला आहे. भारत बंदमध्ये कामगार संघटनांसोबतच अनेक बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनाही सहभागी झाल्या आहेत.

संपाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा मंत्रालयानं सर्व राज्य सरकारांना पत्र लिहून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आवाहन केले आहे.

मागण्यांमध्ये कामगार संहिता रद्द करणे, कोणत्याही प्रकारचे खाजगीकरण थांबवणे आदींचा समावेश आहे. बँकिंग क्षेत्राच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही या संपात सहभागी होत आहोत, असं ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं म्हटलं आहे.


हेही वाचा

आता शिवाजी पार्क देखभालीची कंत्राटदारावर जबाबदारी

पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांना आयकरची नोटीस

पुढील बातमी
इतर बातम्या