12 डिसेंबरला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 2 तासांचा ट्रॅफिक ब्लॉक

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवार, १२ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत पुणे वाहिनीवर कुसगाव (कि.मी ५६/९०० साखळी क्रमांक) आणि ओझर्डे ट्रॉमा केअर सेंटरजवळ (कि.मी ७४/९०० साखळी क्रमांक) येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) करण्यात येणार आहे.

वरील कालावधीत या कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत काम सुरू असताना हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

या कालावधीत पुणे रस्त्यावरील सर्व प्रकारची अवजड वाहतूक तसेच लहान वाहने (चारचाकी) कुसगाव टोल नाक्यावरून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून पुण्याच्या दिशेने वळवण्यात येतील.



हेही वाचा

जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया जलप्रवासात बदल

बेस्ट बसमध्ये 'यांना' करता येणार मोफत प्रवास

पुढील बातमी
इतर बातम्या