वसई विरारमधल्या बेकायदा बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना पालिकेचा झटका

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मनपानं आता वसई विरारमधील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वसई विरार मनपा आयुक्तांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना बेकायदा बांधकामांवर घरपट्टी लागू न करण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाचं पालन न झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

वसई विरार आणि नालासोपारा यासारख्या क्षेत्रात अनेक बांधकाम व्यावसायिक बेकायदा बांधकामं करण्यास सुरवात करतात. मग मानपा अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून त्या बेकायदा बांधकामांचा गृह कर भरण्यास सुरवात करतात. पुढे घर कर असल्याचं दर्शवून, बांधकाम व्यावसायिक ग्राहकांची फसवणूक करतात. घर कर ग्राहकांना दाखवून अशी घरं विकली जातात. पण व्यवहार झाल्यानंतर घर बेकायदेशीर असल्याचं ग्राहकांना समजतं.

वसई विरार भागातील बेकायदा बांधकाम हा मोठा मुद्दा म्हणून समोर येत आहे. या बेकायदा बांधकामांबद्दल नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. अखेर नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्यात आली आहे. आता यापुढे अशा बेकायदा बांधकामांवर घरपट्टी लागू केली जाणार नाही.


हेही वाचा

मुंबई उपनगरीय रेल्वेचं भाडं वाढण्याची शक्यता

'या' कारणास्तव पालिकेची पश्चिम रेल्वेला नोटीस

पुढील बातमी
इतर बातम्या