अखेर दामूनगरमध्ये फुटलेली जलवाहिनी दुरुस्त

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

जलवाहिनी फुटल्याने पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागलेल्या दामूनगरमधील रहिवाशांना अखेर दिलासा मिळाला. कांदिवली पूर्वेकडील दामूनगर परिसरात बुधवारी 4 च्या सुमारास जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे कांदिवली,मालाड पूर्वेकडील काही भागांत गुरुवारी पाणी पुरवठा खंडित करण्यात आला होता. बुधवारी दामूनगरमध्ये असलेली मालाड पूर्व परिसराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी अचानक फुटून मोठा आवाज झाला. 

यामुळे नागरिक घाबरले आणि त्यांनी घराबाहेर धाव घेतली. दरम्यान जलवाहिनी फुटल्याची माहिती तात्काळ रहिवाशांनी पालिका विभागाला कळवताच पालिका अधिकाऱ्यांनी याची माहिती हायड्रोलिक विभागाला दिली. त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी जलवाहिनी दुरुस्त करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी सगळीकडे पाणी सोडण्यात आले.

पुढील बातमी
इतर बातम्या