रेल्वे स्थानकावर एकही स्टॉल नाही

  • प्रेसिता कांबळे & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

किंग्ज सर्कल - किंग्ज सर्कल हे हार्बर तसेच वेस्टर्नलाईनला जोडणारे स्थानक असून रोज १ हजारपेक्षा जास्त प्रवासी येथून प्रवास करतात. पण या प्रवाशांसाठी अल्पाहाराचे एकही स्टॉल नाही. याचे मुख्य कारण म्हणजे स्थानकावरील स्टॉलचे भाडे १८ हजाराहून जास्त असल्याने विक्रेत्यांना हे भाडे परवडत नाही. त्यामुळे इथे स्टॉल टाकण्यास कुणीही तयार नाहीत. याआधी या स्थानकावर २ स्टॉल होते. पण भाडे परवडत नसल्याने तेथील स्टॉल बंद करण्यात आले. २०१४ पासून हे स्टॉल बंद असून कुणीही इतके भाडे भरण्यास तयार नसल्याने स्टॉलची जागा रिकामीच असल्याचे स्टेशन मास्तर एन. के. सिन्हा यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या