मालाडमधील नागरिक कचरापेटीपासून वंचित

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

झकारिया रोड – महापालिकेने केलेल्या कचराकुंडी मुक्त शहराच्या पार्श्वभूमीवर मालाडमध्ये कचराकुंड्या हटवण्यात येत आहेत. झकारिया रोड येथील कचराकुंडी आठवडयाभरापूर्वी हटवण्यात आली. मात्र पालिकेने नागरिकांना कचरा टाकण्यास कोणतीच पर्यायी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.

आराधना बिल्डिंग, राजीया कंपाऊंड, शहा निवास, चिकणे चाळ, मुलचंद केसरमल वाडी,महावीर देशन, गोल वाडी या सोसायटीतील नागरिकांना कचरा कुंडी हटवल्यामुळे दूरवर पायीपीट करत कचरा टाकण्यास जावे लागत आहे. पालिकेची घंटागाडी येते मात्र ती कधी येते याबाबत नागरिकांना माहितीच नाही. त्यामुळे कचरा टाकायचा कुठे, असा सवाल नागरिकांना पडला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या