अर्जुन तेंडुलकरच्या पाच विकेट्समुळे मुंबईची कूचबिहार ट्राॅफीमध्ये रेल्वेवर मात

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मुलानं गोलंदाजीत अापली छाप पाडताना पाच विकेट्स मिळवल्या. अर्जुन तेंडुलकरच्या या कामगिरीमुळं मुंबईने कूचबिहार ट्राॅफीमध्ये रेल्वेचा एक डाव अाणि १०३ धावांनी पराभव केला.

यशस्वी जयस्वालचं द्विशतक

मुंबईनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ३८९ धावा उभारल्या होत्या. यशस्वी जयस्वालच्या द्विशतकाचा त्यात मोलाचा वाटा होता. अर्जुनने २१ धावांचं योगदान दिलं होतं. पहिल्या डावात वशिष्ठने ३० धावांच्या मोबदल्यात अाठ विकेट्स मिळवत रेल्वेचा डाव १५० धावांवर संपुष्टात अाणला.

पहिल्या चार फलंदाजांना अर्जुननं पाठवलं माघारी

मुंबईनं फाॅलो-अाॅन लादल्यानंतर अर्जुनने रेल्वेची अाघाडीची फळी कापून काढली. त्याने रेल्वेच्या चार फलंदाजांना माघारी पाठवलं त्यानंतर नववा विकेट मिळवत एका डावात पाच विकेट्स मिळवण्याची करामत अर्जुनने केली. त्यामुळे रेल्वेचा दुसरा डाव १३६ धावांवर संपुष्टात अाणत मुंबईने डावाने विजय साजरा केला.

पुढील बातमी
इतर बातम्या