मलेशियात मुंबई सीसी संघाचा विजय

पाचव्या अहमद सरजी कप क्रिकेट लीग टुर्नामेंटमध्ये भारताच्या मुंबई सीसी संघांने बांग्लादेशच्या कलाबगन संघाला पराभवाचा धक्का दिला. ही स्पर्धा मलेशिया शहरातील क्वॉलालंपूर येथे खेळवण्यात आली.

यावेळी प्रथम फलंदाजी घेत मुंबई संघाने १८१ धावा करत ४३.८ शतकात सर्व बाद झाले. या सामन्यात मुंबई संघातील सचिन यादव याने ३१ धावा केल्या, तर विकेट कीपर विनायक सामंत याने ४१ धावा करत दोन चौकार, एक षटकार ठोकले. याच संघातील शशी कदमने ४२ धावा करत एक चौकार आणि एक षटकार लगावत मुंबई सीसी संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

मुंबई संघाला प्रत्युत्तर देण्यासाठी बांग्लादेश मैदानात उतरला. पण त्यांना मुंबई संघासमोर फार काळ टिकता आले नाही. मुंबई संघातील गोलंदाज अनिकेत रेडकर, शशी कदम आणि मुरतूझा हुसेन यांनी बांग्लादेशचे दोन गडी बाद करत १०२ अशा धावा करत खेळ संपवला. या सामन्यात मुंबई संघाच्या खेळाडूंनी शानदार खेळ करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मुंबईतल्या शशी कदम याने चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. त्याच्या गोलंदाजीमुळेच बांग्लादेशला १०२ धावांत तंबूत पाठवण्यात मुंबई संघाला यश मिळाले.


हेही वाचा - 

चार मुंबईकरांची भारत अ क्रिकेट संघात निवड

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी भारतीय संघाची निवड


पुढील बातमी
इतर बातम्या