रमेश पोवारलाही व्हायचंय मुंबईचा प्रशिक्षक!

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रिकेट

भारताचा माजी अाॅफस्पिन गोलंदाज रमेश पाेवारनंही मुंबईच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत अाता उडी घेतली अाहे. समीर दिघे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई रणजी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर अाता मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) प्रशिक्षकाचा शोध सुरू केला अाहे. प्रणीण अमरे, सुलक्षण कुलकर्णी, अमोल मुझुमदार, चंद्रकांत पंडित, अोमकार साळवी या नावांची चर्चा सुरू असतानाच त्यात अाता रमेश पोवारचीही भर पडली अाहे.

मुंबई क्रिकेटशी माझं भावनिक नातं

गेली सहा-सात महिने मी एमसीएच्या बीकेसी येथील सेंटरमध्ये फिरकी प्रशिक्षक म्हणून काम पाहत होता. एमसीएच्या कार्यपद्धतीत नेमक्या काय उणीवा अाहेत, याची मला जाण अाहे. मुंबई क्रिकेटशी माझं भावनिक नातं असून अाता मुंबई क्रिकेटसाठीही परतफेड करण्याची वेळ अाली अाहे. मुंबईचा रणजी संघ कुठे कमी पडत अाहे, याची मला पुरेपूर जाण असून मी त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेन. यासाठीच मला मुंबईचा प्रशिक्षक व्हायचं अाहे, असं रमेश पोवारनं सांगितलं.

रमेश पोवारची कारकीर्द

रमेश पोवारनं २००४ ते २००७ दरम्यान भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. तो २ कसोटी, ३१ वनडे अाणि १८ टी-२० सामने खेळला अाहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १४८ सामन्यांत त्याने ४७० विकेट्स मिळवल्या अाहेत. रमेश पोवार सध्या अाॅस्ट्रेलियाच्या २३ वर्षांखालील स्पिनर्सना मार्गदर्शन करण्यासाठी १५ दिवसांच्या ब्रिस्बेन दौऱ्यावर गेला अाहे. या कामासाठी अाॅस्ट्रेलियाचे महान फलंदाज अाणि भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनीच पोवारची शिफारस केली होती.


हेही वाचा -

समीर दिघेंचा मुंबईच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा

मुंबईच्या मुख्य प्रशिक्षकासाठी अोमकार साळवीची शिफारस

पुढील बातमी
इतर बातम्या