अायपीएलच्या उद्घाटनाविषयी सर्व माहिती इथे वाचा!

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रिकेट

उन्हाळ्याच्या सुट्टीतील मनोरंजनाचा धमाका म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीगची उत्सुकता अाता शिगेला पोहोचली अाहे. संपूर्ण देशातील क्रिकेटप्रेमी अाता अायपीएलच्या उद्घाटनाची अातुरतेने वाट पाहत अाहेत. अायपीएलमधील मैदानावरील थरारापेक्षा जास्त चर्चा होते ती अायपीएलच्या उद्घाटनाची. बाॅलीवुडमधील दिग्गज कलाकारांची अदाकारी, गायक-संगीतकारांचा धमाकेदार परफाॅर्मन्स याविषयीची माहिती तुम्हाला देत अाहोत. मुंबई इंडियन्स अाणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात ७ एप्रिलला वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सामन्याद्वारे अायपीएलचं बिगुल वाजणार अाहे.

अायपीएलचं उद्घाटन : शनिवार, ७ एप्रिल २०१८, संध्याकाळी ५ वाजल्यापासून

कुठे : वानखेडे स्टेडियम, मुंबई

या कलाकारांचा जलवा...

अायपीएलच्या उद्घाटन सोहळ्यातून रणवीर सिंगने माघार घेतली अाहे. या सोहळ्यात कोणत्या कलाकारांचा जलवा पाहायला मिळणार, याची अधिकृत यादी जाहीर करण्यात अाली नसली तरी परिणिती चोप्रा, वरुण धवन, जॅकलिन फर्नांडेझ अाणि हृतिक रोशन यांचा जलवा पाहायला मिळणार अाहे.

इथे पाहा सामने...

अातापर्यंत अायपीएलचे सामन्यांचा थरार सोनी समूहाच्या सेट मॅक्सवर पाहता येत होता. मात्र प्रक्षेपणाचे हक्क सोनीकडून स्टार स्पोर्टसकडे गेल्यामुळे अाता अायपीएलचे सामने स्टार स्पोर्टसच्या वाहिन्यांवर पाहता येतील. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्स अाणि राजस्थान राॅयल्स या संघांची घरवापसी झाली अाहे. त्यामुळे गुजरात लायन्स अाणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स हे दोन संघ या वर्षीपासून अायपीएलमध्ये नसतील.


हेही वाचा -

अायपीएलमुळे मुंबई क्रिकेटला उतरती कळा - लालचंद राजपूत यांची टीका

अायपीएलमध्ये खेळण्यासाठी पार करावी लागणार यो-यो टेस्ट

पुढील बातमी
इतर बातम्या