वानखेडेवरील मुंबई इंडियन्सच्या सामन्यांना पाणीकपातीचा फटका?

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रिकेट

दोन वर्षांपूर्वी राज्यात पडलेल्या दुष्काळाचा फटका अायपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या सामन्यांना बसला होता. २०१६ मध्ये महाराष्ट्रातील अायपीएलचे सर्व सामने राज्याबाहेर खेळविण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. अाता यावर्षीही तीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता अाहे. वानखेडे स्टेडियमला अतिरिक्त पाणीपुरवठा करायचा की नाही, याविषयी मुंबई उच्च न्यायालयाने बृहन्मुंबई महापालिकेकडे विचारणा केली अाहे.

लोकसत्ता मूव्हमेंटने २०१६ मध्ये दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देताना न्यायमूर्ती ए. एस. अोका अाणि रियाझ चागला यांनी राज्य दुष्काळाचा सामना करत असताना अायपीएलच्या सामन्यांकरिता हजारो लीटर पाण्याची नासाडी केली जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.

वानखेडेला अतिरिक्त पाणीपुरवठा नाही

दक्षिण मुंबईत असलेल्या वानखेडे स्टेडियमला गेल्या तीन वर्षांपासून विशेष असा पाणीपुरवठा बंद करण्यात अाला अाहे, असे मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयासमोर स्पष्ट केले. मात्र याबाबतचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्याचे अादेश न्यायमूर्ती अोका यांनी दिले अाहेत. व्यावसायिक दरांनुसार जरी वानखेडेला पाणीपुरवठा केला जात असेल तरी त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगण्यात अाले अाहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ एप्रिल रोजी रंगणार अाहे.


हेही वाचा -

अायपीएलमुळे मुंबई क्रिकेटला उतरती कळा - लालचंद राजपूत यांची टीका

अायपीएलमध्ये खेळण्यासाठी पार करावी लागणार यो-यो टेस्ट

पुढील बातमी
इतर बातम्या