अागरकरला दिलासा, हकालपट्टीची याचिका एमसीएने फेटाळली

मुंबई क्रिकेट असोसिएशनने भारताचा माजी क्रिकेटपटू अजित अागरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीला दिलासा दिला अाहे. पारसी जिमखान्याचे उपाध्यक्ष अाणि क्रिकेट सचिव खोदादाद याझदेगर्दी अाणि अन्य क्लबच्या सदस्यांनी निवड समिती बरखास्त करणारी याचिका दाखल केली होती. पण एमसीएने विशेष सर्वसाधारण सभा बोलावणारी ही याचिका फेटाळून लावली अाहे.

खोदादादना धक्का

एमसीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. एस. नाईक यांनी या पत्र लिहून खोदादाद यांची याचिका फेटाळत असल्याचे म्हटले अाहे. खोदादाद यांच्या मागण्या अाम्ही मान्य करत नसून त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत निवड समिती अकार्यक्षम असल्याचा किंवा त्यांच्या कारभारावर ताशेरे अोढणारा एकही पुरावा सादर करण्यात अालेला नाही. त्यामुळे विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे एमसीएने या पत्रात म्हटलं अाहे.

उच्च न्यायालयात जाणार

३९ क्लबच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र अापल्याकडे असूनही जर एमसीए विशेष सर्वसाधारण सभा बोलावत नसेल तर मी मुंबई उच्च न्यायालयात जाणार अाहे. ही सभा बेकायदेशीर अाहे, असं नकारात्मक उत्तर एमसीएकडून मिळत असेल तर हायकोर्टात जाण्यावाचून माझ्याकडे कोणताही पर्याय नाही. एमसीएच्या नियमांप्रमाणे नियम-३७चे उल्लंघन होत असेल तर विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्याची विनंती मी हायकोर्टाला करेन, असे खोदादाद यांनी सांगितले.


हेही वाचा -

अजित अागरकरची निवड समितीतून हकालपट्टी?

अखेर एमसीएने दिला 'त्या’ खेळाडूंना न्याय


इतर बातम्या