विजय हजारे ट्राॅफी: क्वार्टर फायनलसाठी रोहित शर्माचं सिलेक्शन

भारतीय क्रिकेट टीमचा ओपनिंग बॅट्समन रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबईसाठी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळण्यास सज्ज झाला आहे. विजय हजारे ट्राॅफीच्या क्वार्टर फायनलमध्ये बिहारविरूद्ध मुंबई या मॅचसाठी रोहितची निवड करण्यात आली आहे.

रोहितची वेस्ट इंडिजविरोधात सुरू असलेल्या २ टेस्ट मॅचच्या सिरिजमध्ये निवड न झाल्याने मुंबईच्या निवड समितीने हा निर्णय घेतला आहे. या निवड समितीचं नेतृत्व माजी टेस्ट प्लेयर अजित आगरकर करत आहे.

आगरकरने सांगितलं की, मुंबई टीमचं नेतृत्व श्रेयस अय्यर करणार असून रोहित मुंबईसाठी एक किंवा दोन मॅच खेळणार आहे.

याआधी रोहित २०१७ मध्ये मुंबईतर्फे खेळला हाेता. त्यावेळेस रोहित धावांसाठी चाचपडत होता. त्यानंतर आयपीएल आणि चॅम्पियन्स ट्राॅफीत चांगलं प्रदर्शन केल्यानंतर त्याला अंतिम ११ मध्ये स्थान मिळवता आलं.

रोहितप्रमाणेच शिखर धवन देखील दिल्लीकडून एक किंवा दोन मॅच खेळण्याची शक्यता आहे.


हेही वाचा-

विराट म्हणतो, मला पत्नीसोबत राहू द्या!

पीबीएल लिलाव : सायना, सिंधू, श्रीकांतची ८० लाखांत खरेदी


पुढील बातमी
इतर बातम्या