डोपिंगप्रकरणी युसूफ पठाणवर ५ महिन्यांची बंदी

बडोद्याचा अष्टपैलू क्रिकेटपटू युसूफ पठाण सध्या क्रिकेटपासून दूरच होता. तो दुखापतग्रस्त होता की अन्य कारणामुळे तो बाहेर होता, हे कुणालाही समजत नव्हतं. अखेर बीसीसीअायनं युसूफ पठाणच्या बाबतीत धक्कादायक खुलासा केला अाणि सर्वांनाच अाश्चर्याचा धक्का बसला. डोपिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बीसीसीअायनं युसूफ पठाणवर पाच महिन्यांची बंदी घातली अाहे. युसूफवरील ही बंदी १४ जानेवारी २०१८ रोजी संपणार अाहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात पठाणची चाचणी करण्यात अाली होती. त्यात टर्बुटलाइन हे उत्तेजक सापडल्याचे अहवालात समोर अाले अाहे. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संघटनेने (वाडा) टर्बुटलाइनवर बंदी घातली अाहे. त्यामुळे २७ अाॅक्टोबर २०१७ रोजी युसूफवर तात्पुरती बंदी घालण्यात अाली होती. श्वसनासंबंधी अाजार झाल्याने अापण हे अौषध घेतल्याचे पठाणने मान्य केले अाहे. मात्र असे असले तरी तो २७ जानेवारी रोजी होणाऱ्या अायपीएलच्या लिलावासाठी उपलब्ध असेल.

युसूफ पठाणने अनवधानाने हे अौषध घेतल्याचे मान्य केले असून त्याच्या उत्तरावर अाम्ही समाधानी अाहोत. सर्व पुरावे अाणि अन्य बाबींचा विचार करता अाम्ही पठाणवर पाच महिन्यांची बंदी घालत अाहोत.

- बीसीसीअाय

बंदी कधी संपणार?

युसूफ पठाणला झालेली पाच महिन्यांच्या बंदीची शिक्षा १४ जानेवारी रोजी मध्यरात्री संपणार अाहे. ही बंदी १५ अाॅगस्ट २०१७ पासून सुरू झाली होती. पठाणने याअाधीच बीसीसीअायकडे अापली बाजू मांडली होती. मात्र याप्रकरणी व्यवस्थापनाकडून विलंब झाली होती. मात्र तेव्हापासूनच अाम्ही ही बंदीची शिक्षा लागू केली होती, असंही बीसीसीअायकडून स्पष्ट करण्यात अालं अाहे.

पुढील बातमी
इतर बातम्या