मालाडमध्ये समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

मढ - एका 15 वर्षाच्या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना मालाडच्या मढ येथे घडलीये. विशाल पोतदार असं या तरुणाचं नाव असून सोमवारी संध्याकाळी विशाल समुद्रात बुडाला होता. 24 तासांच्या शोधमोहिमेनंतर त्याचा मृतदेह हाती लागला. या प्रकऱणी मालवणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केलीये.

विशाल मालाडच्या पास्कलवाडी परिसरात त्याच्या कुटुंबासोबत राहत होता. सोमवारी दुपारी तो त्याच्या अन्य चार मित्रांसोबत पोहण्यासाठी रिट्रीट हॉटेलमागे असलेल्या समुद्रात उतरला होता. काही वेळाने तो आणि त्याचा मित्र अचानक पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. हे पाहून जीवरक्षकांनी खोल समुद्रात जाऊन त्याच्या मित्राचा जीव वाचवला. मात्र विशाल बुडाला. त्यानंतर त्याला शोधण्याची मोहीम सुरू झाली.

संध्याकाळी उशिरापर्यंत विशालला शोधण्याचं काम अग्निशमन दलाकडून सुरू होतं. मात्र तो सापडलाच नाही. त्यामुळे सोमवारी बचावकार्य थांबवण्यात आलं. अखेर मंगळवारी त्याचा मृतदेह सापडला.

पुढील बातमी
इतर बातम्या