या चिुमरड्याला कुठे पाहिले आहे का?

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

वडाळा - लोकल प्रवासादरम्यान हरवलेल्या एका चिमुरड्याला शोधण्यासाठी वडाळा रेल्वे पोलिसांची एकच धावपळ सुरू आहे. एक जानेवारीला हा मुलगा चेंबूर स्थानकावरून आपल्या आईपासून दुरावला आहे. धनंजय भावसार असे या चिमुरड्याचे नाव आहे.

लोकलमध्ये भीक मागून उदरनिर्वाह करणारी संगीता भावसार चेंबूर स्थानकावरून लोकल पकडत होती. पण संगीताला लोकलमध्ये चढता आले नाही. ती प्लॅटफॉर्मवरच राहिली आणि धनंजय रेल्वेतून पुढे गेला. संगीता दुसरी लोकल पकडून आपल्या चिमुरड्याच्या शोधात निघाली. मात्र मुलगा सापडला नाही.

18 जानेवारीला संगीताने नालासोपाऱ्यातील आपल्या आत्याचे घर गाठून घडलेली घटना सांगितली. दरम्यान तिची प्रकृती आणखीनच खालावली. त्यामुळे तिच्या आत्याने तिला जवळच्याच रुग्णालयात दाखल केले. मात्र पुत्र प्रेमाने व्यथित झालेल्या संगीताने 19 जानेवारीला अखेरचा श्वास घेतला. तिचा अंत्यविधी आटोपल्यावर तिच्या आत्याने 21 जानेवारीला नालासोपारा येथील तुळीस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र रेल्वे पोलिसांच्या हद्दीतील घटना असल्याने तुळीस पोलिसांनी 4 फेब्रुवारीला वडाळा रेल्वे पोलिसांकडे तक्रार वर्ग केली. फिर्यादी महिलेच्या तोंडून पीडित महिलेची व्यथा ऐकून वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय.बी. सरोदे यांनी सर्वोपरी मदतीचे आश्वासन दिले. या मुलाविषयी माहिती मिळाल्यास 9594071735, 02224164688 या नंबरवर संपर्क सांधावा असे आवाहन वडाळा रेल्वे पोलिसांनी केले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या