बालसुधारगृहात सहा मुलांचा मृत्यू

मानखुर्द : अनाथ मुलांसाठी असलेल्या मानखुर्द बालसुधारगृहात गेल्या दीड महिन्यात सहा मुलांचा मृत्यू झाला आहे. याठिकाणी मुलांना योग्य उपचार मिळत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला असून याला शासनच जबाबदार असल्याचा आरोप येथील कर्मचाऱ्यांनी केला आहे. मुलांना याठिकाणी राहण्यासाठी योग्य सोय नाही. तसेच त्यांना वेळेवर जेवण देखील मिळत नाही. शासनाकडून योग्य अनुदानच मिळत नसल्याने या मुलांवर हि वेळ आली आहे. मृतामध्ये 5 मुले आणि एका मुलीचा समावेश असून ही सर्व मुले मतिमंद विभागातील असून सर्व अल्पवयीन आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या