बनावट कागदपत्रांसह महागड्या गाड्या गहाण ठेवून फसवणूक,७ जणांना अटक

कर्जासाठी आलेल्या नागरीकांच्या कागदपत्रांचा वापर करून कर्जावर कार खरेदी करून त्या  कार परराज्यात गहाण ठेवून सामान्य नागिरक तसेच बँकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्जीय टोळीचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १९ महागड्या कार जप्त करण्यात आल्या आहेत. धरमवीर अमिर शर्मा ऊर्फ वसीम नजीमुद्दीन शेख, (३१), मृगेश महालिंगम, नवीधर (४२), साईनाथ व्यंकटेश गंजी ऊर्फ संदीप बोराटे (२६), प्रदीप मोर्या (४६), दिलशाद अलम बद्रूजमान अन्सारी (४४), वजयकुमार शर्मा (३९) सलाम इस्लाम खान (४२) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.  जप्त करण्यात आलेल्या कारची किंमत सुमारे सहा कोटी रुपये आहे. 

हेही वाचाः- लवकरच मुंबईत धावणार विनाचालक मेट्रो

याप्रकरणातील तक्रारदार यांच्याकडे कोणत्याही प्रकारची मोटार कार नसताना त्यांच्या नावाने दोन आर सी बुक ची नोंद झाल्याचे उघड झाले. त्यांनी या प्रकरणी पोलिसांत धाव घेतली असता कार लोनच्या झोल करणाऱ्या टोळीचा उलघडा झाला. युनिट – ५ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगदीश साईल तसेच पथकाने तपास केला असता यात मोठे अंतरराज्यीय रॅकेट सहभागी असल्याचे समोर आले. या प्रकरणातील तपासातून ठाण्यातील वागळे इस्टेट ज्ञानेश्वर नगर येथून तिघा अरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या तपासात आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारांसह एचडीएफसी, स्टेट बँक, आयसीआयसीआय, एक्सिस बँक, पंजाब नॅशनल बँक, डॅमलेर फायनान्शियल सर्व्हीस इंडिया, एव्ही स्मॉल फायनान्स बँक अशा मोठ्या बँकांकडून बोगस नावाने तसेच बनावट नावाने कार लोन मिळवून त्या कार परराज्यात स्वस्तात विकल्याचे उघड झाले. यातील आरोपी काही वेळेस त्या कार गहाणदेखील ठेवून लोकांची व बँकांची फसवणूक करीत होते. आतापर्यंत  पोलिसांनी २ऑडी, २ मर्सिडीस, एक मिनी कूपर, एक फोर्ड कार, टोयाटो फॉर्च्युनर अशा एकूण १९ महागड्या गाड्या जप्त केल्या. यांची ५ कोटी ६१ लाख ८१ रुपयां एवढी किंमत आहे.

हेही वाचाः- मुंबईतील ७८ टक्के भाडेकरूंना स्वत:च्या घरात जाण्याचे वेध

यातील  आरोपी हे कार खरेदी विक्री व्यवसायातील तसेच एक आरोपी बँकेचे माजी कर्मचारी होता. वाहनासाठी आरसी बुक तयार करण्यासाठी यातील आरोपींनी स्मार्ट कार्ड हे अमेझॉन या वेबसाईटवरून मिळवले होते .  ही कारवाई उपायुक्त(गुन्हे) प्रकाश जाधव व सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन अलकनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक साईल यांच्यासह सपोनि  अमोल माळी, महेंद्र पाटील, गव्हाणे,  बंडगर, चिंचोलकर, सावंत, यादव, सोनहिरवे आदींनी केली. तर याचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले

पुढील बातमी
इतर बातम्या