बेरोजगारीला कंटाळून तरुणाची आत्महत्या

गोवंडी - कामधंदा नसल्याने निराश झालेल्या एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी गोवंडीच्या टाटानगर परिसरात घडली आहे. हरेश तायडे (31) असे या तरुणाचे नाव असून, तो याठिकाणी पत्नी आणि ५ वर्षांच्या मुलासह राहत होता. 

गेल्या अनेक महिन्यांपासून या तरुणाला नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे तो निराश होता. दरम्यान गुरुवारी सकाळी घरात कोणीच नसताना त्याने दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळानंतर पत्नीला ही बाब समजल्यानंतर तिने तत्काळ शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला शताब्दी रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत देवनार पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या