'अब तक ५६' सिनेमाच्या स्क्रिप्ट रायटरची आत्महत्या

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

 'अब तक ५६' या प्रसिद्ध सिनेमाचे स्क्रिप्ट रायटर आणि असिस्टंट डायरेक्टर रवीशंकर आलोक यांनी राहात असलेल्या इमारतीच्या टेरेसवरून उडी टाकत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी वर्सोवा पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कुठे रहात होते आलोक?

अंधेरीतील सात बंगला येथील वसंत को. आॅ. सोसायटीत रविशंकर आलोक हे भावासोबत भाड्याने रहात होते. मागील अनेक दिवसांपासून ते नैराश्येच्या गर्तेत होते. त्यांच्यावर यासंदर्भात उपचार देखील सुरू होते. या तणावातून रवीशंकर यांनी इमारतीच्या सातव्या मजल्यावरून दुपारी २ च्या सुमारास उडी टाकत आत्महत्या केली.

नैराश्येतून आत्महत्या?

या घटनेची माहिती इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने तातडीने पोलिसांना दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुसाइड नोट न मिळाल्याने रवीशंकरच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. तरीही टोकाच्या नैराश्येतून आलोक यांनी हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

२००४ मध्ये आलेल्या 'अब तक ५६' या सिनेमात त्यांनी डायरेक्टर शिमित अमीन सोबत असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं होतं. हा सिनेमा लोकप्रिय झाल्यावर त्यांच्या कामाचं चांगलंच कौतुक झालं होतं.


हेही वाचा-

डोंबिवलीतील नाल्यात पडलेल्या तरूणाचा मृतदेह सापडला

धक्कादायक! मुंबईत मुलींच्या अपहरणात वाढ


पुढील बातमी
इतर बातम्या