अपघात बघायला रस्त्यावर थांबू नका; तुमचाही अपघात होईल!

रस्त्यावर एखादा अपघात झाला असेल, तर अनेकजण नक्की झालं काय हे पहाण्यासाठी त्या ठिकाणी उभे रहातात. मात्र मुंबईत असंच उभं रहाणं काही गाडीवाल्यांना महाग पडलं आहे.

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मालाडकडे जाणारा एक दूधाचा टेम्पो पलटी झाला. त्यामुळे टेम्पोमधलं हजारो लिटर दूध संपूर्ण रस्त्यावर पसरलं. या अपघातात टेम्पोचालकाला किरकोळ जखमी झाला. मात्र इथेच सगळा गोंधळ झाला.

हा अपघात झाल्यानंतर झालंय काय, हे पहाण्यासाठी बाजूने जाणाऱ्या काही चालकांनी आपली गाडीचा वेग कमी केला. मात्र तेवढ्यातच एक अर्टिगा कार मागून प्रचंड वेगाने आली आणि रस्त्यात उभ्या असलेल्या तीन गाड्यांना धडक मारून निघूनही गेली. या अपघातात एक लॅन्सर, बाईक आणि स्विफ्ट कारचं मोठं नुकसान झालं. सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी झालं नाही.

या विचित्र अपघातामुळे प्रारंभी प्रत्यक्षदर्शी आणि नंतर पोलिसही थोडा वेळ बुचकळ्यात पडले होते!


हेही वाचा

चेंबूरमध्ये मोनो समोरासमोर, अपघात की बचावकार्य?


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या